महाराष्ट्र

बोगस UDID कार्डधारकांवर कारवाईचे आदेश,

प्रवासादरम्यान तपासणी बंधनकारक

सोलापूर | प्रतिनिधी

दिव्यांग व्यक्तींच्या नावावर बोगस UDID कार्ड वापरून प्रवास केल्याच्या तक्रारी वाढत असताना आता अशा प्रकरणांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. सोलापूर जिल्हा दिव्यांग सक्षमकरण कार्यालयाकडून यासंदर्भात महत्त्वाचे पत्र जारी करण्यात आले आहे.

प्रवासादरम्यान दिव्यांग प्रवाशांची ओळख तपासण्यासाठी UDID वेबसाइटवरून खात्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित व्यक्ती खरोखर दिव्यांग आहे की नाही, याची खातरजमा ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जर एखादी व्यक्ती बोगस UDID कार्ड वापरून प्रवास करत असल्याचे आढळून आले, तर त्यांचे UDID कार्ड जप्त करून दिव्यांग अधिनियम २०१६ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अशा बोगस UDID कार्डधारकांची सविस्तर माहिती जिल्हा दिव्यांग सक्षमकरण कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील विभागीय व तालुकास्तरावरील आगार व्यवस्थापकांना या संदर्भात लेखी सूचना देऊन अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. सर्व आगार व्यवस्थापकांनी याबाबत काटेकोर कार्यवाही करून अहवाल कार्यालयाकडे सादर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे खऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सवलतींचा गैरवापर थांबणार असून बोगस लाभ घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याने प्रशासनाचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page