पांगरदरवाडी येथे सांभामंडप कामासाठी ७ लाखांचा निधी मंजूर
निष्ठावंत शिवसैनिक श्री.लक्ष्मण क्षीरसागर व भावी सरपंच दाजीबा मोरे यांच्या प्रयत्नांना यश

सांभामंडप कामासाठी ७ लाखांचा निधी मंजूर
निष्ठावंत शिवसैनिक श्री.लक्ष्मण क्षीरसागर व भावी सरपंच दाजीबा मोरे यांच्या प्रयत्नांना यश
तामलवाडी / प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे सभामंडप उभारणीसाठी खासदार निधीतून ७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या खासदार फंडातून मंजूर झाला असून, यासाठी निष्ठावंत शिवसैनिक तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री. लक्ष्मण क्षीरसागर व भावी सरपंच श्री.दाजीबा मोरे यांनी विशेष पाठपुरावा केला होता.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यासंदर्भातील मंजुरीपत्र लक्ष्मण क्षीरसागर यांना प्रदान केले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कायम कटिबद्ध असून, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामे सुरू असल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
सभामंडपाच्या कामासाठी निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी दाजीबा मोरे, अनंत फंड, विनोद शिंदे, अभिषेक शिंदे, रविराज मारडकर, सुरज मते, अक्षय मारडकर, सागर मारडकर, विष्णू गाटे, महेश शेळके, गणेश कदम, राजेंद्र सुबराव जाधव, दर्शन शेळके, लक्ष्मण गाटे, विजय गायकवाड आदींसह ग्रामस्थांनी खासदार ओमराजे निंबाळकर व लक्ष्मण क्षीरसागर यांचे आभार मानले.



