महाराष्ट्र

तहसीलदार बोळंगेना मागितली पंधरा लाखाची खंडणी

आरोपी मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे प्रतिनियुक्तीवर असलेल्या मंडळअधिकाऱ्याने तक्रार मागे घेण्यासाठी चक्क तहसीलदारांनाचा खंडणी मागितल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. मंडळ अधिकाऱ्यासह अन्य एका विरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नामे-दिनेश बहिरमल, मंडळ अधिकारी आरळी बु.(प्रतिनियुक्ती), बालाजी बोडके रा. ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि.06.12.2025 रोजी 13.30 ते 13.40 वा. सु. तुळजापूर येथे फिर्यादी नामे-अरविंद शंकरराव बोळंगे, वय 43 वर्षे, रा. गवते प्लॉटींग तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे विरुध्द दिलेली तक्रार मागे घेण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी 15 लाख व त्यानंतर 10 लाख व फोनवर दोन लाख रुपयाची मागणी केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अरविंद बोळंगे यांनी दि.09.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे तुळजापूर येथे भा.न्या.सं.कलम 308(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातमी मागची बातमी

मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल यांनी 2020 साली क्रेडिड कार्डच्या माध्यमातून कर्ज घेतले होते. कालांतराने त्यांचे कर्जाचे हप्ते थांबले गेले. बहिरमल यांना कॉलसेंटर कडून कॉल करूनही उपयोग होत नसल्यामुळे क्रेडिट कार्डच्या वसुली प्रतिनिधी यांनी तहसीलदार अरविंद बोळंगे यांना सतत कॉल येत राहिले. एक दोन वेळा तहसीलदारांनी बहिरमल यांना यांसदर्भात कळविले. मात्र, वसुली प्रतिनिधीकडून तहसीलदार यांना सतत कॉल येत राहिल्याने तहसीलदार अरविंद बोळंगे व मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल यांच्यात खडाजंगी झाली. शिवीगाळ केल्या प्रकरणी बहिरमल यांनी तहसीलदार यांच्याविरुद्ध आनंद नगर पोलिसात तक्रार दिली तर दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी बहिरमल यांनी तहसीलदार अरविंद बोळंगेना खंडणी मागितली. यावरून बहिरमलच्या विरोधात बोळंगेनी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page