गुन्हेगारी

धाराशिवच्या तांबरी भागात माजी नगरसेविकेच्या कुटुंबाला मारहाण; २० ते २५ जण घरात घुसल्याची प्राथमिक माहिती

जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल; परिसरात घटनेची चर्चा

धाराशिव : धाराशिव शहरातील तांबरी भागात माजी नगरसेविका मीनाक्षी महादेव माळी यांच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, २० ते २५ जणांनी घरात प्रवेश करून कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेत कुटुंबातील काही सदस्य जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, ही घटना नेमकी कोणत्या कारणातून घडली, याबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेची अधिकृत माहिती आणि पोलिसांची भूमिका समोर आल्यानंतरच पुढील तपशील स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page