ब्रेकिंग
डॉ. मैनाक घोष यांची बदली; सांगली येथे जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती
मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव या पदावर श्रीमती.प्रियवंदा महाडदळकर यांची नियुक्ती

मुंबई (प्रतिनिधी) – राज्य शासनाने प्रशासनिक पातळीवर महत्त्वपूर्ण बदल करत डॉ. मैनाक घोष, भा.प्र.से. यांची बदली केली आहे. त्यांची नियुक्ती सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार, डॉ. घोष यांना मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव या पदावरून तत्काळ कार्यमुक्त होऊन नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या जागी श्रीमती.प्रियवंदा महाडदळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या आदेशावर सहसचिव सुभाष उमरानिकर यांची सही असून, हा आदेश २९ मार्च २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, डॉ. मैनाक घोष यांच्या नियुक्तीमुळे सांगली जिल्ह्यातील प्रशासन अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

