ब्रेकिंग

तामलवाडी परिसरात भीषण अपघात; २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

सुरतगावजवळ दोन दुचाकींना पिकअपची पाठीमागून धडक; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

तामलवाडी : तुळजापूर-सोलापूर महामार्गावरील सुरतगाव येथे पिकअपने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

या अपघातात अनिल सिद्राम मुद्देबिहाळ (वय २७, रा. न्यू पाच्छा पेठ, स्वातंत्र्य सैनिक नगर, सोलापूर) यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. तर शिवलीग सतीश शिरूर, पंकज कृष्णदेव जाधव आणि संकेत राजकुमार बोडगे (तिघेही रा. सोलापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत.

नेमका अपघात कसा घडला?

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, संबंधित चार जण दोन दुचाकींवरून प्रवास करत होते. तुळजापूर ते सोलापूर मार्गावरील सुरतगावजवळ कर्नाटक नोंदणीच्या पिकअप वाहनाने दोन्ही दुचाकींना पाठीमागून धडक दिली. पिकअप चालकाने वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालविल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.या धडकेत अनिल मुद्देबिहाळ यांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघांना गंभीर दुखापत झाली.

तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी सिद्राम ईराप्पा मुद्देबिहाळ (वय ७२, रा. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात पिकअप चालक असिफ पिरमहमंद बेळगी (रा. वळसंगी, ता. निदगुंदी, जि. विजापूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page