महाराष्ट्र

पांगरदरवाडी येथे ‘आपले सरकार सेवा केंद्रा’तर्फे पानपोईचे उद्घाटन

हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर पानपोईचा शुभारंभ

तामलवाडी – तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे ‘आपले सरकार सेवा केंद्रा’तर्फे नागरिकांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर पानपोईचा शुभारंभ करण्यात आला.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गावातील नागरिक, प्रवासी तसेच शेतकरी यांना दिलासा मिळावा या उद्देशाने ही पानपोई सुरू करण्यात आली आहे. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून दिवसभर थंड व स्वच्छ पाणी नागरिकांना मिळणार आहे.

यावेळी ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत ‘आपले सरकार सेवा केंद्रा’च्या सामाजिक बांधिलकीचे अभिनंदन केले. अशा उपक्रमांमुळे गावात सेवाभाव आणि सहकार्याची भावना अधिक दृढ होत असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले.

पानपोईच्या उद्घाटन प्रसंगी गावातील जेष्ठ नागरिक बिभीषण शिंदे, माणिक सावंत, सुनील जाधव, सत्यवान शिंदे, महादेव सावंत, सोमनाथ डोंगरे, सोमनाथ शिंदे, गणेश गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page