कृषिवार्ता

वादळी पावसामुळे सौर ऊर्जा पंपाचे नुकसान; शेतकऱ्यास नुकसानभरपाईची मागणी

तामलवाडी – तुळजापूर तालुक्यातील मौजे काटी येथील शेतकरी श्री अमितकुमार दत्तात्रय सोनवणे यांच्या काटी-सावरगाव महसूल मंडळातील काटी हद्दीतील गट क्रमांक 443 मधील शेतामध्ये बसविण्यात आलेला जी के कंपनीचा सौर ऊर्जा पंप दिनांक 5 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या दरम्यान आलेल्या वादळी पावसामुळे उखडून पालथा पडल्याची घटना घडली.

या घटनेत सौर ऊर्जा प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित कंपनीने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा तसेच सौर ऊर्जा प्रकल्पासाठी असलेल्या विमा संरक्षणाअंतर्गत शेतकरी अमितकुमार सोनवणे यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे शेतीसह विविध मालमत्तांचे नुकसान होत असून अशा परिस्थितीत विमा योजनांचा लाभ बाधित शेतकऱ्यांना त्वरित मिळणे आवश्यक असल्याचे मत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणा व कंपनीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page