महाराष्ट्र

खडकी येथे ६०० ते ७०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

ज्येष्ठ नागरिक, वडीलधारी मंडळी व माताभगिनी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण

तामलवाडी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई येथील गोवर्धिनी सार्वजनिक सेवा संस्था बेलापूर यांच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील खडकी येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सुनील नागणे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. खडकी गावासह शिवाजीनगर तांडा परिसरातील सुमारे ६०० ते ७०० विद्यार्थ्यांना बॅग, वही व पेन असा शालेय साहित्याचा संच देण्यात आला. गावातील ज्येष्ठ नागरिक, वडीलधारी मंडळी व माताभगिनी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले.

बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई विजय म्हात्रे यांच्या पुढाकारातून दरवर्षी खडकी गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत केली जाते. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळीही आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून गावातील नागरिकांना दिवाळी किटचे वाटप करण्यात आले होते. आपल्या मतदारसंघाबाहेरील तुळजापूर तालुक्यातील खडकी गावासाठीही सातत्याने मदतीचा हात देत असल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार म्हात्रे यांचे आभार मानले.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुनील नागणे म्हणाले, “आमदार मंदाताई विजय म्हात्रे यांच्या माध्यमातून यंदाही ६०० ते ७०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले. आपल्या गावावर प्रेम करणाऱ्या ताईंनी मतदारसंघाबाहेर असूनही केवळ एका शब्दावर मदत पोहोचवली. त्यांना आई तुळजाभवानी मातेने निरोगी आयुष्य व उदंड आशीर्वाद द्यावा, हीच प्रार्थना.”

कार्यक्रमास शरफोद्दीन मुजावर, परमेश्वर शिंदे, शिवाजी जाधव, लालसिंग चव्हाण, पंडित गायकवाड, शांताबाई कोरे, मथुराबाई नागणे, बलभीम जाधव, भागवत साळुंखे, संतोष शिंदे, मल्लिनाथ गायकवाड, दादाराव खोडके, तात्याराव शिंदे, गौसपाक सय्यद, विजय साळुंखे यांच्यासह गावातील लहानथोर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय समितीचे अध्यक्ष इस्माईल पटेल यांनी केले. विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहित्याच्या माध्यमातून सहकार्य केल्याबद्दल व गोवर्धिनी सार्वजनिक सेवा संस्था, बेलापूर यांचे मुख्याध्यापक श्री. शेखू जेठीथोर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page