महाराष्ट्र

उन्हाळ्यात जार पाण्याची वाढती मागणी; गुणवत्ता तपासणे का ठरतेय अत्यावश्यक ?

धाराशिव / प्रतिनिधी 
सध्या प्रचंड उन्हाळ्यामुळे थंड पाण्याची गरज वाढली असून शहरात आणि ग्रामीण भागात जारच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, केवळ थंड पाणी मिळते म्हणून जारचे पाणी वापरणे धोकादायक ठरू शकते. पाण्याची गुणवत्ता तपासणे आता अत्यावश्यक बनले आहे. अनेक ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया (RO/UV) योग्य पद्धतीने केली जाते का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
काही विक्रेते केवळ साधे फिल्टर करून किंवा जुन्या जारमध्ये पाणी भरून विक्री करत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. त्यामुळे हे पाणी शंभर टक्के सुरक्षित आहे का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दूषित किंवा अपूर्णपणे फिल्टर केलेले पाणी पिण्यामुळे पोटाचे विकार, जुलाब, टायफॉइड, पिवळ्या काविळीसारखे आजार होऊ शकतात. विशेषतः उन्हाळ्यात अशा आजारांचा धोका अधिक वाढतो.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी 
फक्त नोंदणीकृत व विश्वासार्ह पुरवठादारांकडूनच जार पाणी घ्यावे
जारवरील सील, उत्पादन तारीख आणि ब्रँड तपासावा जार स्वच्छ आहे का, आत घाण किंवा कण दिसत नाहीत ना याची खात्री करावी पाण्याची चव, वास वेगळा वाटल्यास त्वरित वापर थांबवावा
दरम्यान, प्रशासनानेही जार पाणी विक्रेत्यांवर नियमित तपासणी मोहीम राबवून निकृष्ट दर्जाचे पाणी विकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
उन्हाळ्यात शरीराला पाणी आवश्यक असले तरी ते सुरक्षित आणि शुद्ध असणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे थंड आहे” एवढ्यावर न थांबता शुद्ध आहे का? हे तपासणे आता काळाची गरज बनली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page