ब्रेकिंग
सोलापूरात आढळला दोन हजार वर्षांपूर्वीचा सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह
भारतातील सर्वात मोठा आणि १५ रिंगण असलेला दगडी चक्रव्यूह सापडला

सोलापूर : सोलापूर जवळील बोरामणी गवताळ प्रदेशात भारतातील सर्वात मोठा आणि १५ रिंगण असलेला दगडी चक्रव्यूह सापडला आहे. नेचर सर्कलच्या सदस्यांना लांडग्यांचे निरीक्षण करताना ही वर्तुळाकार रचना दिसून आली. पुण्याचे अभ्यासक सचिन पाटील यांच्या मते, हा चक्रव्यूह साधारण दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन रोमन संस्कृतीच्या खुणा दर्शवणारा असून तो ‘तेर’कडे जाणाऱ्या मार्गाचा भाग असू शकतो.
लहान दगडी गोट्यांनी बनलेली ही रचना जमिनीपासून १ ते १.५ इंच उंच असून शतकानुशतके अबाधित आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी याला ‘कोड्याचा भाग’ संबोधत संशोधनाला विरोध दर्शवला आहे. हा दुर्मिळ चक्रव्यूह पाहण्यासाठी आता इतिहासप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे.


