तुळजापूरात खंडणीसाठी थेट किडनॅपची धमकी
वाईन शॉप चालकाकडून हफ्ता उकळण्याचा प्रयत्न – तिघांना मस्ती अंगलट, तुळजापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

तुळजापूर : तुळजापूरात वाईन शॉप मालकाला हप्त्यासाठी थेट किडन्याप करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली असून जुने बसस्थानक परिसरातील चेतना वाईन शॉप येथे दि. 22 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास गंभीर प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी फिर्यादी अमर श्रीराम नाईक (वय 52, रा. पंढरपूरकल गल्ली, तुळजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रशांत कांबळे, बालाजी जाधव व बाबा शेख (सर्व रा. तुळजापूर) या तिघांनी वाईन शॉपवर येऊन फिर्यादी व त्यांच्या मुलास किडनॅपची धमकीदिली. आरोपींनी दुकानातून ₹3,100 रुपयांचा माल जबरदस्तीने नेला तसेच दरमहा ₹10,000 हफ्ता दे, अन्यथा मुलाला किडनॅप करू अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम 308(3), 352 व 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.


