महाराष्ट्र

सह्याद्री हॉस्पिटल प्रकरणी तात्काळ कारवाई करा – आरोग्यदूत मंगेश चिवटेंची मागणी

हिवाळी अधिवेशनात मंगेश चिवटे यांची संवेदनशील मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी भेट;

नागपूर | प्रतिनिधी
नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीत पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या रुग्ण मृत्यू प्रकरणाची सविस्तर माहिती मुख्यमंत्री यांना देण्यात आली. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कै.केरू. सकपाल या रुग्णावर उपचार सुरू असताना गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचा आरोप असून, उपचार प्रक्रियेत वैद्यकीय प्रोटोकॉलचे पालन झाले की नाही, रुग्णाला वेळेत योग्य उपचार मिळाले का, तसेच हॉस्पिटल प्रशासनाची भूमिका काय होती, याबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

या संदर्भात मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे सादर केलेल्या पत्रामध्ये संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. रुग्णाच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय तज्ज्ञ समिती (Independent Medical Board) नेमावी, तसेच दोषी डॉक्टर, कर्मचारी व हॉस्पिटल प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठोस मागणी यावेळी करण्यात आली.
संवेदनशील मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून, दोषी आढळणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
राज्यातील आरोग्य सेवा अधिक पारदर्शक, जबाबदार आणि रुग्णाभिमुख राहाव्यात, तसेच अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत यासाठी शासनस्तरावर आवश्यक ती पावले उचलली जातील, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी दिला.
या भेटीमुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, आरोग्य विषयक गंभीर प्रश्नांवर राज्य शासन संवेदनशीलतेने काम करत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page