महाराष्ट्र

तामलवाडी प्रवासी संघटनेचा स्तुत्य उपक्रम; एसटी महामंडळाला गावनावाचे बोर्ड

प्रवाशांसाठी शिवाजी पाटील यांचा पुढाकार

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री.शिवाजी पाटील यांनी एसटी महामंडळाच्या गाड्यांना गावांच्या नावाचे बोर्ड दिल्याने पाटील यांचे एसटी महामंडळ आणि स्थानिक गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे. पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करत असून आतापर्यंत त्यांनी विविध 12 आगारांच्या गाड्यांना बोर्ड दिले आहेत. सामान्य गोरगरीब लोकांसाठी असलेले एसटी महांडळ व विद्युत महामंडळ टीकावे यासाठी ते जनजागृती करतात. स्वार्थी दुनियेत निस्वार्थीपणे काम करणारे पाटील यांच्यासारखे लोकं कमीच असल्याचे तामलवाडी येथील नागरिक सांगतात.

पाटील यांनी राज्यातील एसटी महामंडळाच्या विविध विभाग नियंत्रकांशी भेटून, परिवहन मंत्र्यांना भेटून, काही ठिकाणी पत्रव्यवहार करून तामलवाडी पंचक्रोशीतिल नागरिकांसाठी तामलवाडी येथे थांबा मिळवून दिला आहे. यामुळे या भागातील नागरिकांची मोठी सोय झाली. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली आहे. यावेळी नवीन गाडीचा तामलवाडी येथे थांबा मिळाल्यावर त्या वाहक चालकाचा शिवाजी पाटील हे स्वतःच त्यांना बुके, शाल घालून सत्कार करतात. कधी चालक-वाहक तामलवाडी येथे थांबा न करता असरसाळगाव लागतात तेव्हा त्यांच्या अधिकाऱ्यांना भेटून त्या गाडीचा थांबा पाटील हे पूर्ववत करून घेतात.

उपक्रम याचेही महत्व ते एसटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देतात. त्यामुळे या ठिकाणचा थांबा अधिकाऱ्यांनी सुरू केला. नोकरदार मंडळी आणि शालेय विद्यार्थ्यांना वेळेत गाड्या मिळाव्यात, यासाठी पाटील हे स्वतःचा काम धंदा सोडून रोज सकाळी ३ ते ४ तास तामलवाडी चौकावर येऊन थांबतात; हेही त्यांचे विशेषच आहे. एकंदरीत, या प्रवासी संघटना अध्यक्षांमुळे तामलवाडी आणि पंचक्रोशीतील कामगारवर्गाला सेवा एसटी बससेवा येथे मिळाल्या आणि एसटीच्या उत्पन्नात भरिव वाढ झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page