ब्रेकिंग

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या; इंस्टाग्रामवर “सॉरी डार्लिंग”ची अखेरची स्टोरी

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या; इंस्टाग्रामवर “सॉरी डार्लिंग”ची अखेरची स्टोरी 

तामलवाडी/प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथील एका २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गंजेवाडी येथील बाळासाहेब दत्तात्रय दळवी (वय २५) यांने सांगवी (काटी) शिवारातील जम्मू पंजाब ढाब्यासमोर उभ्या असलेल्या आयशर टेम्पोमध्ये दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटील यांनी दिल्यानंतर तामलवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तामलवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी संबंधित तरुणाने आपल्या इंस्टाग्राम खात्यावर “सॉरी डार्लिंग” असा मजकूर असलेली स्टोरी पोस्ट केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे.

तरुण वयातच टोकाचे पाऊल उचलल्याने नातेवाईक व मित्रपरिवारात शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पुढील तपास तामलवाडी पोलीस करीत आहेत.

टीप : आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही. मानसिक तणाव, नैराश्य किंवा भावनिक अडचणी असल्यास कुटुंबीय, मित्र किंवा तज्ज्ञांची मदत घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page