ब्रेकिंग

मंत्री कोकाटेंना तातडीने अटक करण्याचे कोर्टाचे आदेश

सदनिका गैरव्यावहार प्रकरण भोवलं..!

नाशिक – राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. सदनिका गैरव्यवहार प्रकरण त्यांना चांगलेच भोवलं असून मंत्री कोकाटेसह त्यांचे बंधू यांना अटक करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. सध्या कोकाटे हे मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले असून त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नाशिकच्या न्यायालयाने मंगळवारी सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वारंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज युक्तिवाद होऊन नाशिक कोर्टाने त्यांना तात्काळ अटक करण्याचे वारंट जारी करण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page