शासनाच्या दिरंगाईविरोधात दिव्यांगांचा एल्गार
निर्णय कागदावरच; दिव्यांगांचा प्रशासनाला जाब, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

दि. 27 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवांसाठी मंजूर असलेला 30 लाख रुपयांचा स्थानिक आमदार निधी अद्याप खर्च न झाल्याने प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. हा निधी तात्काळ खर्च न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
तसेच दि. 05 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार निराधार व दिव्यांग योजनांतील 25 वर्षांची अट रद्द करण्यात आली असतानाही अनेक लाभार्थ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी दिव्यांग पेन्शन 1500 रुपयांवरून 2500 रुपये करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक लाभार्थ्यांना वाढीव पेन्शन मिळालेली नसल्याने शासन निर्णय कागदापुरताच मर्यादित असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र ठोस निर्णय न झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष श्री. मयूर काकडे यांनी केले. आंदोलनात श्री. बाळासाहेब पाटील, श्री. महादेव चोपदार, श्री. महेश माळी, श्री. जमीर शेख, श्री. अभिजीत साळुंखे, श्री. नवनाथ कचार, श्री. संजय नाईकवाडी, श्री. मारुती वाघमारे, श्री. दिनेश पोद्दार, श्री. शब्दर शेख, श्री. बालाजी तांबे, श्री. मेहबूब तांबोळी, श्री. संजय शिंदे, श्री. राजेश भिसे, श्री. हरेश्वर कुंभार, घनश्याम डक , श्री. धनंजय खांडेकर, श्री. सुधीर खडबडे, श्री. बबन शिरसाट, श्री. बाप्पा काशीद, श्री. रमेश शिंदे, श्री. गणेश जगताप, श्री. राजेंद्र अनभुले, श्री. गौतम दुधे, श्री. दत्तू गजभार, श्री. जग्गू तात्या चौरे, श्री. शिवाजीराव नेपते, श्री. राजाभाऊ खांडेकर, श्री. अर्जुन वाघमारे, श्री. सहदेव कांबळे, श्री. मुक्तार पटेल, श्री. विकास शिरसागर, श्री. बाबासाहेब भोयटे, श्री. औदुंबर भणगे, श्री. राजेंद्र आकाडे, श्री. सतीश कोळगे, श्री. चांगदेव माने, श्री. गणपत कस्पटे, श्री. उमाकांत गरगटे, श्री. आकाश (अक्षय) गलांडे, श्री. शिवा पडळकर, श्री. राजाभाऊ कोकरे, श्री. दत्तात्रय कोळगे, श्री. गोकर्ण कोळगे, श्री. सचिन गुरव, श्री. विष्णू कोळगे, श्री. गणू डावकरे, श्री. पैगंबर मुलाणी, श्री. अमोल पाडे, श्री. किशोर कांबळे, श्री. रसुल सय्यद, श्री. महादेव भोवाळ, श्री. रितेश धुटे, श्री. आनंद नन्नवर, श्री. कृष्णा बाबर, श्री. सागर माळी, श्री. रविकांत गिरगां, श्री. ईशाख शेख, श्री. ज्ञानेश्वर मदने, श्री. नारायण भुसणे, श्री. कदम ज्ञानेकर, श्री. टोपिक अव्दोल शेख, श्री. उमाकांत भोसले, श्री. धनराज माने, श्री. मुशीन शेख, श्री. आखीन गिरे, श्री. गुंडू फारुख बागवान, श्री. माशाळे बनसाली, श्री. राहुल बनसोडे, श्री. सिद्धिक बागवान, श्री. होजोदिन जमादार, श्री. महेश आलपन सोमवंशी, श्री. पळसगाव पिजारी, श्री. दस्तगीर विजयकुमार शेळके, श्री. डिगंबर गायकवाड, श्री. नागेश मसरे, श्री. महेश हरकुल, श्री. भैरू मशाळे, श्री. मारुती दादा जाधव, श्री. इरया स्वामी, श्रीमती राणी मुसळे, श्री. दत्ता पवार, श्री. आत्माराम बनसोडे, श्री. कोरिया स्वामी, श्री. श्रीशैल पाटील आदी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



