
प्रतिनिधी|फुलंब्री
फुलंब्री तालुक्यातील रोजगार हमी योजनेंतर्गत ३३ गावांतील ९६ कामांसाठी चक्क मजुरांचा एकच फोटो वापरून 5 कोटी हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासक अंकित यांनी ७ रोजगार सेवकांना बडतर्फ केले आहे. त्याचबरोबर २ सहायक कार्यक्रम अधिकारी, ७ अभियंता आणि २ संगणक ऑपरेटर अशा११ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसबजावली आहे. या कामांमध्ये ५ कोटी १८ लाखांची बिले उचलण्यात आली आहेत. तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मातोश्रीपाणंद रस्ते योजनेच्या कामातीलगैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.


