Uncategorized
Trending

शेतकऱ्यांच्या समान हक्कांसाठी ओमराजेंची संसदेत गर्जना

MREGS योजनांचा लाभ आता नगरपालिका शेतकऱ्यांनाही?

नवी दिल्ली : नगरपालिका आणि नगरपंचायत हद्दीत वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (MREGS) तसेच इतर कृषी-पशुसंवर्धन योजनांचा समान आणि त्वरित वैयक्तिक लाभ द्यावा, अशी ठाम आणि जाहीर मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज लोकसभेत केली.
शून्य प्रहरात बोलताना त्यांनी सांगितले की,
नगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या हजारो कुटुंबांची उपजीविका प्रत्यक्ष शेतीवरच आधारित आहे. मात्र केवळ नगरपालिका हद्दीतील वास्तव्यामुळे त्यांना अनेक MREGS योजनांच्या पात्रतेतून वगळले जाते, ही मोठी अन्यायकारक बाब आहे. त्यामुळे या कुटुंबांचा विकास थांबला असून ते कृषी योजनांच्या मुख्य प्रवाहाबाहेर राहत असल्याची खंत निंबाळकर यांनी व्यक्त केली.
खासदार निंबाळकर यांनी सभागृहात स्पष्टपणे अधोरेखित केले की—
“नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतरस्ते, गाय-गोठा, वैयक्तिक विहीर, फळबाग लागवड, तुती लागवड अशा MREGS योजनांचा त्वरित आणि समान लाभ देणे अत्यावश्यक आहे. ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये भेदभाव होऊ नये.”
त्यांनी योजनेच्या विस्तारामुळे होणारे लाभही मांडले—
* शेती उत्पादन व उत्पन्न वाढ
* सिंचन सुविधांत सुधारणा
* फळबाग व तुती लागवडीला चालना
* पशुपालनावर आधारित आर्थिक स्वावलंबन
केंद्र सरकारकडे केलेल्या प्रमुख मागण्या :
1.नगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना ग्रामीण शेतकऱ्यांप्रमाणे समान लाभ द्यावेत.
2.सर्व कृषी, पायाभूत सुविधा व पशुसंवर्धन योजना या भागासाठी तात्काळ खुल्या कराव्यात.
3.निकषांमध्ये आवश्यक बदल करून पात्र शेतकऱ्यांना अनुदान, मंजुरी आणि तांत्रिक मदत त्वरीत उपलब्ध करून द्यावी.
खासदार निंबाळकर यांची ही भूमिका नगरपालिका हद्दीतील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरत असून कृषी क्षेत्रातील असमानता दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page