गुन्हेगारी

तामलवाडी पोलिसांची दमदार कामगिरी

CEIR पोर्टलच्या मदतीने शोधले महागडे मोबाईल, लातूर पुणे येथून हस्तगत केले मोबाईल

तामलवाडी | प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेले पाच महागडे मोबाईल फोन शोधून मूळ मालकांना परत देण्यात तामलवाडी पोलिसांना यश आले आहे. या मोबाईल फोनची एकूण किंमत सुमारे दीड लाख रुपये इतकी आहे. लातूर, पुणे आणि तामलवाडी परिसरातून हे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलिसांनी CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास सुरू केला. मोबाईलच्या IMEI क्रमांकाच्या आधारे सखोल शोध घेतल्यानंतर विविध ठिकाणांहून पाचही मोबाईल पोलिसांनी शोधून काढले आहेत.

तपासाअंती हे मोबाईल आमीर सरदार मोगल (रा. धोत्री), शुभम परमेश्वर स्वामी (रा. सावरगाव), महेश गोरख कांबळे (रा. काटी), श्रीकांत दत्ता आदलिंगे, शुभम मारुती फंड (रा. सावरगाव) या तक्रारदारांना अधिकृतपणे मोबाईल सुपूर्द करण्यात आले आहेत.

ही कारवाई तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गोकुळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. उमेश माने यांनी यशस्वीपणे पार पाडली. तामलवाडी पोलिसांच्या या कार्यक्षमतेमुळे नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला असून, हरवलेली मालमत्ता शोधून देण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करता येतो याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page