ब्रेकिंग

‘लोकसत्ता धाराशिव’च्या वृत्ताची दखल; ग्रामपंचायत सदस्यांना दिलासा, १२३ कोटींचा निधी मंजूर

नावालाच गावाचे कारभारी; केवळ २०० रुपयांचेच धनी! वृत्तानंतर शासन हलले – १२३ कोटी ८ लाखांचा निधी मंजूर

धाराशिव : ग्रामीण कारभाराचा कणा असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठक भत्त्याबाबत ‘लोकसत्ता धाराशिव’ने २९ डिसेंबर रोजी प्रकाशित केलेल्या वृत्ताची अखेर महाराष्ट्र शासनाने गंभीर दखल घेतली आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर शासनाने सकारात्मक पाऊल उचलत ग्रामपंचायत सदस्यांचा बैठक भत्ता, सरपंच व उपसरपंच यांचे मानधन तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी १२३ कोटी ८ लाख ४० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

ग्रामपंचायत सदस्यांना केवळ २०० रुपयांचा बैठक भत्ता मिळतो, तोही वेळेवर मिळत नसल्याने सदस्यांमध्ये तीव्र नाराजी होती. अनेक ठिकाणी भत्त्यासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत होते. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी, मजूर वर्गातील सदस्य गावाच्या विकासासाठी झटत असतानाही त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याचे वास्तव ‘लोकसत्ता धाराशिव’ने ठळकपणे मांडले होते.

या वृत्ताचा परिणाम म्हणून महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव श्रीमती कविता पोतदार यांनी यासंदर्भातील शासन निर्णय (जी.आर.) प्रसिद्ध केला असून लवकरच ग्रामपंचायत सदस्यांना बैठक भत्ता प्रत्यक्ष मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे ग्रामपंचायत पातळीवरील लोकप्रतिनिधींना दिलासा मिळाला असून शासनाकडून त्यांच्या कामाची दखल घेतली गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

ग्रामीण विकासाचा पाया मजबूत करण्यासाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना सन्मानजनक मोबदला मिळणे अत्यावश्यक आहे. ‘लोकसत्ता धाराशिव’च्या वृत्तामुळे शासन हलले आणि निर्णय झाला—हीच या बातमीची खरी इम्पॅक्ट स्टोरी ठरली आहे.

ग्रामपंचायत_कर्मचाऱ्यांच्या_वेतन_व_सरपंच,उपसरपंच_यांचे_मानधन_व

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page