गुन्हेगारीब्रेकिंग

तामलवाडीत गोवंशीय मांसाची बेकायदेशीर वाहतूक उघड; दोघांवर गुन्हा दाखल

तामलवाडी /  तामलवाडी परिसरात गोवंशीय जनावरांचे मांस बेकायदेशीररीत्या वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. 29 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.04 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून संशयित वाहन अडवले.

तपासणीदरम्यान हुंडाई कंपनीची अ‍ॅसेन्ट कार (क्र. MH 12 BG 5554) मध्ये सुमारे 400 किलो गोवंशीय जनावरांचे मांस आढळून आले. यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत संबंधित वाहन जप्त केले.

या प्रकरणी सोहेब शकुर कुरेशी व शाकुर इनामदार (दोघेही रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत कलम 5(क) व 9(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा अधिक तपास तामलवाडी पोलीस करत असून या प्रकरणामागील साखळी उघड करण्याचे काम सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page