राजकीय

उमेदवारांसमोर मोठे आव्हान, आठ दिवसांत मतदारांपर्यंत पोहोचायचे कसे ?

इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीसाठी कमी वेळ, उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच

भैय्या कुलकर्णी

सावरगाव / प्रतिनिधी

राज्यभरातील जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकीची घोषणा मंगळवार, दि. २३ रोजी झाली. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया केवळ २९ दिवसांत आटोपली जाणार आहे. खरं तर आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत मतदानापर्यंत पोहोचायचे आहे. निवडणुका एवढ्या कमी कालावधीत झाल्यामुळे राज्यव्यापी ही पहिल्यांदाच असावी. राज्यातील राजकारणात एवढ्या कमी कालावधीत निवडणूक लढवावी लागणे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचायचे कसे? असा प्रश्न जिल्हा परिषद निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसमोर उभा ठाकला आहे. तर दुसरीकडे आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून उमेदवार पक्षाकडे फिल्डिंग लावताना दिसत आहेत.

मतदारांवरही परिणाम

प्रचारासाठी लागणारा एकूण कालावधी एकदम कमी असल्यामुळे मतदारांपर्यंत माहिती पोहोचवण्याची जबाबदारी वाढणार आहे. उमेदवारांची भूमिका, कार्यक्रम व आश्वासनांची माहिती कमी वेळेत मिळाल्याने मतदारांसाठी अधिक सजग राहून निर्णय घ्यावा लागणार आहे. एकूणच कमी दिवसांत निवडणूक कार्यक्रम आटोपणार असल्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत मोठ्या संख्येने उमेदवार उतरले असले तरी, निवडणूक लढवण्यासाठी सभा, मेळावे आणि प्रभावी संपर्क यावर भर देणे आवश्यक ठरणार आहे.

परिषदेच्या निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. संबंधित यंत्रणेकडून दिलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक २५ फेब्रुवारीपर्यंत आटोपली जाणार आहे.

पक्षांची रणनीती बदलणार 

मिळालेल्या संक्षिप्त प्रचार कालावधीमुळे राजकीय पक्षांना उमेदवारांची निवड अधिक नियोजनपूर्वक करावी लागणार आहे. प्रचार साहित्य, घोषणा, पत्रके आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार अधिक गतीने करावा लागणार आहे. मोठ्या शहरात वृत्तपत्रांतून थेट मतदार संपर्क, स्थानिक प्रचारावर आधारित प्रचार अधिक प्रभावी ठरणार आहे.

जिल्हा परिषदच्या निवडणुकीत प्रचारासाठी मिळणार आठवडाच उमेदवारांसमोर मोठे आव्हान 

निवडणूक कार्यक्रमानुसार १६ ते २१ जानेवारी अर्ज भरण्याची, नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची, २२ रोजी छाननी, २७ पर्यंत माघार व ५ फेब्रुवारी रोजी मतदान आहे. माघारीनंतर म्हणजे २८ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या आठ दिवसांत उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचायचे आहे. त्यामुळे या आठ दिवसांत प्रचारासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने अत्यंत संक्षिप्त आणि वेगवान कार्यक्रम जाहीर केला आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अवघ्या २९ दिवसांत पूर्ण केली जाणार असून, २७ दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहेत, त्यापैकी निवडणूक चिन्ह वाटप झाल्यानंतरचा प्रचाराचा कालावधी केवळ आठ दिवसांचा असणार आहे.

मतदारसंख्या मोठी, भौगोलिक क्षेत्रफळ विस्तीर्ण आणि साधनसामग्री मर्यादित असल्याने कमी वेळेत सर्व मतदारांशी संपर्क साधणे कठीण ठरणार आहे. त्यामुळे घराघरांत जाऊन प्रचार करण्यापेक्षा सभा, संपर्क अभियान, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने अधिक प्रभावी प्रचार केला जाणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page