ब्रेकिंग

रोजगार हमी योजनेतून 5 कोटी हडपले‎

फुलंब्रीत 7 रोजगार सेवकांवर कारवाई

प्रतिनिधी|फुलंब्री

फुलंब्री तालुक्यातील रोजगार हमी योजनेंतर्गत ३३ गावांतील ९६ कामांसाठी चक्क मजुरांचा एकच फोटो वापरून 5 कोटी हडप केल्याचा ‎‎धक्कादायक प्रकार समोर आला आहे.‎ त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी ‎‎अधिकारी, प्रशासक अंकित यांनी ७ रोजगार ‎‎सेवकांना बडतर्फ केले आहे. ‎‎त्याचबरोबर २ सहायक कार्यक्रम अधिकारी, ‎७ अभियंता आणि २ संगणक ऑपरेटर अशा‎११ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस‎बजावली आहे. या कामांमध्ये ५ कोटी १८ ‎‎लाखांची बिले उचलण्यात आली आहेत.‎ तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मातोश्री‎पाणंद रस्ते योजनेच्या कामातील‎गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली‎ आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page