कृषिवार्ता

सलग तिसऱ्या दिवशी लोकमंगल कारखान्याचे गाळप बंद

दोनशे शेतकऱ्यांचा गव्हाणीत ठिय्या, पहिली उचल तीन हजार देण्याची मागणी

सोलापूर प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्यातील बीबी दारफळ येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गव्हाणीत सलग तीन दिवसापासून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ठिय्या मारून बसले आहेत.

कारखाना व्यवस्थापकांनी 2700 रुपये पाहिली उचल जाहीर केली होती. मात्र, हा प्रस्ताव शेतकरी संघटनेने फेटाळला असून 3000 हजार दरावर शेतकरी संघटना ठाम आहे. जवळपास दोनशे शेतकऱ्यांनी तीन दिवसांपासून लोकमंगल शुगरच्या गव्हाणीत ठिय्या दिला आहे.

रविवारी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी मंगळवारी पाहिली उचल जाहीर करु असे आश्वासन दिले होते मात्र, अद्यापही दर जाहीर केला नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आंदोलनाच्या धसक्याने या कारखान्यांनी जाहीर केली पाहिली उचल

शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या धसक्याने सोलापूर जिल्ह्यातल्या पाच कारखान्यांनी पाहिली उचल तीन हजार जाहीर केली आहे. यामध्ये भैरवनाथ शुगर्स विहाळा (करमाळा), भैरवनाथ शुगर्स (लवंगी – मंगळवेढा), युटोपीयन (कचरेवाडी – मंगळवेढा), फॅबटेक (मंगळवेढा), लोकनेते (अनगर – मोहळ)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page